लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील महिलांना मिळाला आर्थिक आधार : महिलांनी राज्यसरकार सह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मानले आभार .
उपसंपादक :दिलीप वाघमारे
राज्यातील महिलांना आर्थिक सहकार्य मिळावे या दृष्टिकोनातून राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू करू प्रत्येक महिलेला दीड हजार रुपये देण्याची योजना सुरू केल्याने राज्यातील महिला आनंदी झाले असून राज्य सरकारने आमचा आर्थिक सन्मान केल्याची भावना या महिलांनी बोलून दाखवले आहे तर ही योजना सुरू केल्याने आमच्या कुटुंबाला आर्थिक आधार मिळाला आहे अशाच योजना या पुढील काळात राज्य सरकारने सुरू ठेवाव्यात आणि महिलांचा सन्मान करावा असे मत देखील या लाडक्या बहिणी योजनेच्या लाभार्थी महिलांनी आपले मत व्यक्त केले आहे
ही योजना कार्यान्वित व्हावी यासाठी विशेष प्रयत्न करणारे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील तोंड भरून कौतुक या महिलांनी केला आहे रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येलाच लाखो महिलांना आपल्या खात्यात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून 3000 हजार रुपये लाभ मिळाला आहे त्यामुळे या महिलांना आता सन्मानाणे जगण्याचा एक आधार देखील मिळाल्याची त्यांची भावना आहे.
ज्या सरकारच्या पाठीशी महिला खंबीरपणे उभी आहे त्या सरकारच्या विरोधक कितीही उलट सुलट चर्चा केली तरी यावेळेला विरोधी पक्षाला कोणतेही यश मिळणार नाही कारण आमच्या पाठीशी खंबीरपणे आमच्या बहिणीची ताकद उभी राहिली आहे अशा भावना देखील राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले आहे