भोर काँग्रेस उपाध्यक्षपदी मोहरी गावचे संदीप खोपडे यांची निवड.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर : पुत्र व्हावा ऐसा गुंडा त्याचा त्रिलोकी झेंडा मोहरी गावचे माजी शालेय शिक्षण समिती अध्यक्ष संदीप भिमाजी खोपडे यांची आज भोर कॉग्रेस उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली.
यावेळी भोर राजगड मुळशीचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार मा. संग्राम थोपटे तथा मा.जिल्हा नियोजन समिती सदस्य राहुल लेकावळे आणि भोर तालुका अध्यक्ष शैलेश सोनवणे व पुणे जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश टापरे यांच्या उपस्थितीत यांना भोर तालुका राष्ट्रीय कार्यकारणीचे उपाध्यक्ष पदाचे नियुक्तीचे पत्र देण्यात आले.
त्यावेळी माजी परिषद सदस्य विठ्ठल आवाळे व माजी सभापती लहुनाना शेलार माजी सभापती बाळासाहेब थोपटे के.डी. सोनवणे विविध गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तथा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन व संचालक आणि पदाधिकारी व काँग्रेस चे कार्यकर्ते उपस्थित होते.


