अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी येथील विद्यार्थ्यांनी चंदीगड येथे झालेल्या ओपन तायक्वांदो इंडो नेपाळ चॅम्पियनशिपमध्ये पुमसे प्रकारात चार सुवर्णपदकांची कमाई करून राजगडच्या शिरपेचात मानाचा रोवला तुरा.
सारोळे : दिनांक ११ व १२ मे रोजी चंदिगड पंजाब येथे झालेल्या इंडो नेपाळ या दोन देशामध्ये इंटरनॅशनल तायक्वांदो स्पर्धा पार पडल्या, तब्बल ६०० स्पर्धक या स्पर्धे मधें सहभागी झाले होते..या स्पर्धेमध्ये कु. सई किरण साळेकर (इयत्ता पहिली-सुवर्णं पदक ) सारोळा, कु. ईश्वरी सचिन शेटे( इयत्ता सहावी- सुवर्ण पदक ) नसरापूर ‘कु. कृष्णल पितांबर शेटे (इयत्ता सहावीसुवर्ण पदक ) नसरापूर व कु. श्रुती सागर खिलारे (इयत्ता सहावी-सुवर्ण पदक ) यांनी उत्तम कामगिरी करून नेत्रदीपक यश संपदान केले, सर्व विद्यार्थी अनंत निर्मल ग्लोबल स्कूल चे क्रीडा प्रशिक्षक किरण साळेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत होते

यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष, तथा माजी मंत्री – आनंतराव थोपटे , कार्याध्यक्ष आमदार – संग्राम थोपटे, मानद सचिव – स्वरूपाताई थोपटे व कॅम्पस चे इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, स्कूलचे प्राचार्या सबिहा शेख यांनी विद्यार्थ्यांना या स्पर्धेसाठी प्रोत्साहन देऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.


