वेळे येथील अपघातात एक ठार तर एक गंभीर रित्या जखमी


 

वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण

ADVERTISEMENT

पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर वेळ येथे सकाळी 11 वाजता मुंबईहून पाटणला निघालेले संतोष विठ्ठल कदम वय 42 राहणार गुडे ता.पाटण जि.सातारा.व समृद्धी विलास पाटील रा.बनपुरी रा.पाटण जि.सातारा हे स्कोडा गाडी क्रमांक MH 11Q5758 ने वेळे येथे आले असता महामार्गावर एक नंबर लेनवर कलरचे पट्टे मारण्याचे काम करत असलेला 407 टेम्पो क्रमांक MH 11 F 5368 वर ही स्कोडा गाडी जोरदार आपटली त्यामध्ये समृद्धी पाटील ही महिला गंभीररित्या जखमी झाली तर चालक असलेले संतोष कदम हे सुद्धा गंभीरित्या जखमी झाले असून या दोघांना अधिक उपचारासाठी शिरवळ येथील जोगळेकर हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले असता समृद्धी पाटील यांना वैद्यकीय सूत्रांनी मृत घोषित केले.
या अपघाताची नोंद भुईंज पोलीस स्टेशनला झाली असून अधिक तपास सपोनि संतोष तासगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अप्पासाहेब कोलवडकर हे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!