कोरेगाव ता कराड गावचे यात्रेमध्ये हातात पिस्टल घेवून वावरणाऱ्या युवकाकडून काडतुसासह पिस्टल हस्तगत केले! स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची धडक कारवाई.
सातारा प्रतिनिधी : लोकसभा निवडणूक प्रक्रिया २०२४ च्या अनुषंगाने आचारसंहिता कालावधीत बेकायदेशीर शस्त्रे व अग्नीशस्त्रे बाळगणान्या इसमांवर कारवाई करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांना दिलेल्या होत्या व त्यानुसार पोलीस निरीक्षक अरूण देवकर यांनी स्थानिक गुन्हे शाखेकडील अधिपत्याखालील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार केले होते.
मौजे कोरेगांव, ता. कराड येथे गांवचे वाषीक यात्रेमध्ये जमलेल्या गदीमध्ये एक युवक हातात पिस्टल घेवून
वावरत असलेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना खास बातमीदारामार्फल प्राप्त झालेली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधोर पाटील व त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकास पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सुचना देवून मौजे कोरेगांव, ता.कराड या गांवचे
परिसरात पेट्रोलींग करून कारवाई करणेबाबत सुचना दिल्या. दिनांक २५/०५/२०२४ रोजी रात्रीचे सुमारास स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील त्यांच्या अधिपत्त्याखाली असलेल्या पथकाने कावे तसेच कोरेगांव तालुका कराड परिसरात पेट्रोलिंग करोत
व असताना मिळाले बालमी मधील वर्णनाप्रमाणे एक युवक कोरेगांव ता. कराड बाजूकडून येणारे रस्त्याने पायी चालत येत असताना दिसला त्याचावर संशय आलेने त्यास ताब्यात घेवून त्याची अंगझडती घेतली असता त्याचे कब्जात ७०,०००/- किंमतीचे १ देशी बनावटीचे पिस्टल व १ जिवंत काडतूस किंमत रू.२०० असा एकूण ७०२००/-
चा मुद्देमाल त्याचे ताब्यात मिळून आलेने त्या युवकाविरुध्द कराड तालुका पोलीस वाणे गुरनं. ३४९/२०२४ शरणबंदी अधिनियम (सुधारीत) २०१९ चे कलम ३.७.२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सातारा पोलीस दलाकडून माहे नोव्हेंबर २०२२ पासून ते आजपावेतो ८७ देशी बनावटीची पिस्टल, ३ बारा बोअर बंदूक, १ रायफल, १९७ जिवंत काडतुसे, व ३८५ रिकाम्या पंगळ्या, १ रिकामे मॅग्झीन असे जप्त करण्यात आलेले आहेत.
सदर कारवाई मध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा व श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस
अधीक्षक सातारा, स्थानिक गुन्हे शास्त्रेचे पोलीस निरीक्षक अरूण देवकर, यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे स.पो.नि. सुधीर पाटोल, पृथ्वीराज ताटे, रोहित फाणे, पोउनि विश्वास शिंगाडे, तानाजी माने, सहा. पोलीस उपनिरीक्षक सुधीर बनकर, पो.हवा. विजय कांचळे, संजय शिर्के, अतीश घाडगे, सचिन साळुंखे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, सनी आवटे, मुनिर मुल्ला, अमित झेंडे, अजय जाधव, राजू कांबळे, धिरज महाडीक, मोहसीन मोमीन, अमृत करपे, दलजिलसिंह जगदाळे, विजय निकम, तसेच कराड तालुका पोलीस ठाणे कडील स.पो.नि. अभिजीत चौधरी, पोलीस अंमलदार योगेश गायकवाड, सज्जन जगताप, धनंजय कोळो यांनी सहभाग घेतला. अशा प्रकारे लोकसभा निवडणूक आचारसंहिता कालावधीत केलेल्या उत्कृष्ट कारवाईयावत सहभागी अधिकारी व अंमलदार यांचे समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा व अत्तुल सबनीस, पोलीस उप अधीक्षक, सातारा यांनी अभिनंदन केले.

 
			

 
					 
							 
							