एक लाख रुपये किंमतीच्या कॉपर कॉईलची चोरी.


भोर प्रतिनिधी : सागर खुडे

भोर तालुक्यातील धांगवडी येथील जयवंत ग्रुप कंपनीने शेताच्या कडेला उभा केलेल्या इलेक्ट्रीक पोलचे डिपीवरील ट्रान्सफॉर्मर मधील कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी २४० किलो १ लाख ५ हजार रुपये किंमतीची कॉपर कॉईल चोरून नेली आहे. अशी तक्रार किकवी वीज महावितरणचे कर्मचारी कपिल यशवंत येवले राहणार किकवी ता. भोर जि. पुणे यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

याबाबत राजगड पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दि १३ मे२०२४ रोजी सांयकाळी ७ वाजेपासून ते १४ मे २०२४ रोजी सकाळी १० वाजेपर्यतच्या दरम्यान निगडे ता भोर जि पुणे येथून के डी केशर येथे असलेली ६३ एन पो नी व मौजे भागवडी ता भोर जि पुणे येथील जयवंत गृप कंपनीने कडेला असलेल्या शेतामधील एक २००एम पी नी डीपी ही इलेकट्रीक पोलचे डिपीवरील ट्रान्स्फॉर्मरचे ऑईलचे टॅक कोणीतरी अज्ञात चोरट्याने खाली पाडुन दोन्ही डीपी मधील ऑईल सांडुन नुकसान करून दोन्हीं ट्रान्स्फर्मर मधील २४० किलो कॉपरची कॉईल किंमत १लाख ५हजार रुपयेची चोरून नेली आहे . अशी तक्रार कपिल यशवंत येवले यांनी त्या अज्ञात चोरट्याविरुध्द राजगड पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे.

सदर गुन्हयाचा अधिक तपास पोलिस नाईक लडकत व पोलिस नाईक सुर्यवंशी करित आहेत.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!