वाई ! दारु पिवून पतीने पत्नीला केली मारहाण, पोलीसात तक्रार दाखल.
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
दत्तनगर सिद्धनाथवाडी येथे सौ. आशा पुनाजी ढवळे वय ३४ या रहातात. त्यांचा पती पुनाजी शिवराम ढवळे वय ३८ याने दि. १० मे रोजी रात्री ११ वाजता घरातच दारु पिवून आला. आशा यांना म्हणाला मला गाडी घ्यायची आहे. तु पैसे दे. त्यावर आशा म्हणाल्या, मी कोठून देवू पैसे. मी कामाला जाते काय असे त्या म्हणाल्या. यावरुन चिडून जावून पुनाजी याने लाकडी काठीने आशा यांना हातावर, पायावर मारहाण केली. त्यात त्या जखमी झाल्या. यावरुन पती पुनाजी याच्यावर दि. ११ मे रोजी दुपारी १.४१ मिनिटांनी वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे.

 
			

 
					 
							 
							