फलटण तालुक्यात वीज कोसळून महाविद्यालय शिक्षण घेणाऱ्या एकाचा मृत्यू! दोघेजण गंभीर जखमी.
प्रतिनिधी : फलटण तालुक्यातील सरडे गावाचे हद्दीत ओला या इलेक्ट्रिक गाडीवर वीज कोसळून एकाचा मृत्यू तर दोघेजण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवार दिनांक ११ रोजी घडली आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, सरडे गावात ओला इलेक्ट्रिक दुचाकीवर वीज कोसळून ज्ञानेश्वर शंकर ढोले ( वय १९ रा. वंजारवाडी जामखेड जिल्हा अहमदनगर ) असे वीज पडून मृत्यू झालेल्या महाविद्यालयीन युवकाचे नाव आहे. तर ऋषिकेश भिसे ( वय १९ रा. वायसेवाडी कर्जत जिल्हा अहमदनगर ) व विक्रम धायगुडे वय १७ रा. सरडे ता.फलटण हे दोघेजण गंभीर जखमी झाले आहे.
हे तिघेजण शनिवारी सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान ओला इलेक्ट्रिक दुचाकीवरून सरडे बंगला रस्त्यात जात होते. यादरम्यान विजांचा लखलखाट व कडकडाट सुरू होता. अचानक त्यांच्या दुचाकी वर वीज कोसळली व काही कळायच्या आत एकाचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.त्यांच्यावर बारामती मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वरील तीनही विद्यार्थी शारदानगर येथे आयटीआयचे शिक्षण घेत असल्याची प्राथमिक माहिती फलटणचे तहसीलदार डॉ अभिजीत जाधव यांनी दिली.


