नाशिक येथे झालेल्या कराटे चॅम्पियन स्पर्धेमध्ये भोर तालुक्यातील न्हावी गावातील प्रियांशु जगताप यांची सुवर्ण कामगिरी! 


सारोळे प्रतिनिधी :   भोर तालुक्यातील पूर्व भागातील न्हावी गावातील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांची नात प्रियांशु हिने कराटे मध्ये सुवर्णपदक प्राप्त केले आहे.

 

 

नाशिक येथे वर्ल्ड ट्रॅडिशनल शॉटोकन कराटे फेडेरेशन ऑल इंडिया कडून आयोजित केलेल्या कराटे चॅम्पियनशिप २०२४ मध्ये प्रियांशू उर्फ माई हिने कुमैती या प्रकारात सुवर्णपदक तसेच काथा या प्रकारात रजतपदक जिंकले.

 

ADVERTISEMENT

माईने तिच्या कारकीर्दीमधील पहिल्या स्पर्धेपासून विजयी सुरुवात करून येणाऱ्या प्रत्येक स्पर्धेत सर्वोत्तम स्थान मिळवले आहे. अर्थात या यशामध्ये तिचे कठोर परिश्रम व नित्य सराव त्याचबरोबर प्रशिक्षक, तिचे आजोबा भालचंद्र जगताप, वडील उद्योजक वैभव जगताप आणि आई वकील सौ. स्नेहल जगताप यांचेही तितकेच योगदान आहे. माईला पुढील प्रत्येक स्पर्धेत सुद्धा असेच भरघोस यश मिळून सर्व क्षेत्रात सर्वोत्तम स्थान मिळून नेहमी अजिंक्य राहो अशा सदिच्छा सर्वांच्या वतीने देण्यात येत आहेत. भोर तालुक्यातील सर्वांच्या वतीने शुभेच्छा देऊन प्रियांशू उर्फ माई वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!