मुस्लिम समाजाची एकमुखी भूमिका खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले महाराज यांना पाठिंबा.


 

सातारा प्रतिनिधी : धर्मेंद्र वर्पे

छत्रपती घराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी ५ वर्षाने येते त्याचा लाभ घेत आमची साथ देणार.रहिमतपूर मधील मुस्लिम समाजाची एकमुखी भूमिका.

छत्रपती घराणेचे आमच्यावरील प्रेमाचे प्रतीक म्हणजेच हि रहिमतपूर मधील शाही मस्जिद आहे आणि राजघराण्याच्या प्रेमच्यामुळेच आज ह्या शहरातील सर्वधर्मीय सर्वधर्मसमभाव जोपासत गुण्या गोविंदाने राहतात आणि छत्रपती शिवरायांचे विचार अंगिकारायचा प्रयत्न करत असतात. राजघराण्याच्या प्रेमामुळेच आणि छत्रपती शिवरायांच्या सर्वधर्मसमभावाच्या शिकवणीमुळेच सातारा जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम हातात हात घालून जीवन जगत असतात आणि ह्या राजघराण्याच्या प्रेमाचे ऋण फेडायची संधी ५ वर्षाने येत असते आणि ह्या संधीचा लाभ घेत बहुतांशी मुस्लिम समाज छत्रपती उदयनराजे यांना साथ देणार असा निर्धार रहिमतपूर मुस्लिम समाजाने भेटी दरम्यान केला.

ADVERTISEMENT

कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे भेटीसाठी आल्यांनतर शाही मस्जिदला भेट देण्याचे ठरविले, शाही मस्जिदीला भेटी दरम्यान मुस्लिम बांधवाच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या तसेच शाही वजूचा हौद आणि रणदुल्लाखान यांच्या मकबरा ह्याला भेट दिली.

यावेळी जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम,मनोज घोरपडे, चित्रलेखा माने,संतोष कणसे, सादिकभाई शेख, इर्शाद बागवान उपस्थित होते. रहिमतपूर मुस्लिम जमातीचे चांद आतार ,आबिद सिद्दीकी ,मेहमूद शेख ,तौसिफ़ मुल्ला ,समीर मुल्ला ,नासिर शेख, सैफ शेख ,गफूर मुल्ला ,फैय्याज मुल्ला ,युंनूस शेख ,इरफान इनामदार ,आदिल मुल्ला ,सलमान मुल्ला ,साहिल संधे,अनिस मुल्ला आदी व मुस्लिम बांधव उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!