अनंत निर्मल चॅरिटेबल ट्रस्ट च्या संस्थापक अध्यक्ष स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या वतीने मोफत नेत्र तपासणी शिबिर वांगणी येथे आयोजित.


सारोळे : मंगेश पवार

राजगड ज्ञानपीठ भोरच्या मानद सचिव व अंनतनिर्मल चारिटेबल ट्रस्टच्या संस्थापक अध्यक्षा स्वरूपा संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली जय हनुमान तरुण मंडळ वांगणी यांच्या वतीने आज  हनुमान जयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले.

 

या शिबिरांतर्गत २२५ नागरिकांनी आपल्या डोळ्यांची तपासणी करून घेतली. तसेच १५५ रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले व १९ रुग्ण्नांना मोफत डोळ्यांच्या शस्त्रक्रिये करिता पाठविण्यात आले.

ADVERTISEMENT

प्रसंगी राजगड ज्ञानपीठ भोरच्या मानद सचिव स्वरूपा संग्राम थोपटे,मा.जिल्हा परिषद सदस्या गीता आंबवले, वांगणी गावचे उपसरपंच शिवाजी चोरघे, राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक अरविंद सोंडकर,मा.सभापती सविता वाडघरे, भोर तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजेंद्र शेटे, सेवादलचे अध्यक्ष आकाश वाडघरे, सरपंच शीतल चोरघे, तसेच दुर्गा चोरघे,रावसाहेब चौधरी, यांच्यासह वांगणी गावचे ग्रामस्थ महिला व तरुण वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!