पुणे सातारा रोडवरील निगडे गावच्या हद्दीतील भंगार दुकानासमोरून मोबाईल आणि रोख रक्कम अज्ञात चोरट्याने चोरली.


 

मंगेश पवार

सारोळे : निगडे गावाच्या हद्दीतील पुणे सातारा रोडवरील भंगार दुकानासमोरून मोबाईल आणि रोख रक्कम चोरीस गेली असल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.

ADVERTISEMENT

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पुणे सातारा रोडवर निगडे गावाच्या हद्दीत सोमवार दि.22/4/24 रोजी रात्री 9:30 वा चे सुमारास ते दि.23/4/24 रोजी मध्यरात्री1:30 वा. चे सुमारास अस्लम गफार खान वय 30 वर्ष मूळ रा. ग्रामदवा ता. इटवा जि.सिद्धार्थनगर उत्तर प्रदेश हा आणि त्याचा मित्र हलीम खान दुकानासमोर झोपले असता उशाला ठेवलेले मोबाईल व रोख रकमेसह असा एकूण 40000 रुपये अज्ञात चोरट्याने चोरून नेले. म्हणून अस्लम खान यांनी राजगड पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक मदने नाना करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!