शिरवळ पोलिसांची धडाकेबाज कारवाई : शिरवळ मधील 3 आणि खंडाळ्यातील 1 ला 3 जिल्ह्यातून हद्दपार.
मंगेश पवार
प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यामध्ये शिरवळ पोलीस ठाणे हद्दीमध्ये सातत्याने शरीराविरुद्धचे तसेच मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणारे टोळी प्रमुख 1) आतिश उर्फ बाबू राजेंद्र कांबळे वय 21 वर्ष रा शिरवळ ता.खंडाळा जि. सातारा 2) विशाल शेखर वाडेकर वय 23 वर्ष रा शिरवळ ता खंडाळा 3) रामा दादा मंडलिक वय 20 वर्ष रा सटवाई कॉलनी शिरवळ ता खंडाळा जि सातारा 4) संजय विजय कोळी वय 21 वर्ष राहणार संभाजी चौक खंडाळा, ता.खंडाळा जि. सातारा यांचे टोळीवर शिरवळ पोलीस ठाण्यात खुणाचा प्रयत्न करणे,जबरी चोरी करणे, घरफोडी चोरी करणे,गंभीर दुखापत पोचवून शिवीगाळ दमदाटी करणे, असे गंभीर गुन्हे दाखल असल्याचे तसेच सदर टोळीच्या बेकायदेशीर कृत्यांना आळा बसविण्यासाठी शिरवळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक नवनाथ मदने, पोलीस निरीक्षक शिरवळ पोलीस ठाणे यांनी सदर टोळी विरुद्ध महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 प्रमाणे पूर्ण सातारा पुणे सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षे तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्याकडे सादर केलेला होता. सदर प्रस्तावाची चौकशी राहुल धस उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग यांनी केली होती.
सदर टोळीतील इसमांचेवर दाखल असलेल्या गुन्ह्यांमध्ये त्यांच्यावर वेळोवेळी अटक तसेच प्रतिबंधक कारवाई करूनही त्यांच्यावर गुन्हे करण्याच्या प्रवृत्तीत कोणताही बदल झाला नाही. ते सर्व परिसरात सातत्याने गुन्हे करीत होते त्यांच्यावर कायद्याचा कोणताच धाक न राहिल्यामुळे शिरवळ तसेच आसपासच्या परिसरातील लोकांना मोठ्या प्रमाणावर या टोळीचा उपद्रव होत होता, अशा टोळीवर सर्वसामान्य जनतेमधून कडक कारवाई करण्याची मागणी होत होती.
समीर शेख हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षक सातारा यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 55 अन्वये पूर्ण सातारा तसेच पुणे सोलापूर जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता हद्दपारचा आदेश पारित केला आहे.
नोव्हेंबर 2022 पासून मपोकाक 55 प्रमाणे 24 उपद्रवी डोळ्यांमधील 79 इसमांना मपोकाक 56 प्रमाणे 24 इस मंना मपोकाक 57 प्रमाणे दोन्ही 2 इसमांना असे एकूण 105 इसमाविरुद्ध तडीपार सारखी कारवाई करण्यात आली असून भविष्यातही आगामी लोकसभा निवडणूक 2024 अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांच्या विरुद्ध हद्दपार,मोक्का,एमपीडीए अशा कायद्या अंतर्गत अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार आहेत.
या कामी हद्दपार प्राधिकरणा पुढे सरकार पक्षाच्या वतीने श्रीमती आंचल दलाल, अप्पर पोलीस अधीक्षक सातारा यांच्या मार्गदर्शकाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानीक गुन्हे शाखा सातारा, पोलीस उपनिरीक्षक तानाजी माने, पो. हवा प्रमोद सावंत, अमित सपकाळ, पो. कॉ.केतन शिंदे म. पो. कॉ. अनुराधा सणस, शिरवळ पोलीस ठाण्याचे पो. हवा. सचिन वीर, पो.कॉ. मंगेश मोझर यांनी योग्य पुरावा सादर केला.


