महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित, राजर्षी शाहू विद्या मंदिर आंबेगाव बु।।, पुणे बालवाडी विभागात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी.
पुणे आंबेगाव : पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा l गुरुर साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः l
महात्मा फुले विद्या प्रतिष्ठान संचलित, राजर्षी शाहू विद्या मंदिर आंबेगाव बु।।, पुणे बालवाडी विभागात शनिवार दि. २० रोजी गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली. गुरुपौर्णिमेनिमित्त विद्यालयात मातृ पूजनाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रशालेत शिशु गटातील मुलांनी आपल्या मातेचे पूजन करून आशीर्वाद घेतले.
गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित कार्यक्रमात मा. आमदार उल्हास पवार यांच्या प्रेरणेतून व संस्था अध्यक्ष प्रा.डॉ. व्हि. एस. अंकलकोटे पाटील यांच्या मार्गदर्शनातून, प्रशासकीय संचालक उत्तम चव्हाण, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका मिनल साने, बालवाडी विभाग प्रमुख राणी पाखरे, बालवाडी शिक्षिका तेजश्री यादव, सुप्रिया शेळके ,अनिता देव, तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक उपस्थित होते.

तसेच गुरुपौर्णिमेनिमित्त प्रथम सरस्वती पूजन करण्यात आले. शिवानी कोटीभास्कर यांनी मुलांकडून संस्कृत श्लोक म्हणून घेतले. तसेच मुलांना गुरुपौर्णिमेनिमित्त गुरुपौर्णिमेची माहिती सांगून रामदास स्वामींची श्रेष्ठ अज्ञान ही गोष्ट सांगण्यात आली. मुलांनी शिक्षकांना गुलाब पुष्प देऊन शिक्षकांचे आशीर्वाद घेतले.


