लोणंद-शिरवळ रस्ता अखेर वाहतुकीसाठी खुला
लोणंद संपादक: दिलीप वाघमारे
निरा देवघर कॅनॉलच्या कामामुळे अनेक दिवसांपासून बंद असलेला लोणंद-शिरवळ रस्ता अखेर 15 मे 2025 रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. कॅनॉलचे काही काम शिल्लक असतानाही रस्ता बंद ठेवल्याने MIDC परिसरात वारंवार अपघातांची मालिका घडत होती, त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते.
या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी पंचायतराज ग्राम विकास समितीचे अध्यक्ष मा. श्री. अनिल कुदळे यांनी 14 मे रोजी कॅनॉल प्रशासनास तातडीने रस्ता सुरू करण्याच्या सूचना दिल्या. त्यांच्या पाठपुराव्यामुळे प्रशासनाने त्वरित उपाययोजना करत उर्वरित कॅनॉल काम सुरळीत पार पाडत 15 मे रोजी रस्ता वाहतुकीसाठी खुला केला.
या कामात भाजपचे उपाध्यक्ष मा. विक्रमजी पावस्कर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच जिल्हा सरचिटणीस सौ वनिताताई शिर्के जिल्हा कार्यकारिणी सदस्य मा. श्री. प्रदीप क्षीरसागर तालुका अध्यक्ष मा श्री अनिरुद्ध गाढवे यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.
खंडाळा तालुक्यातील जनतेच्या वतीने कॅनॉल प्रशासनाचे व भाजप पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानण्यात येत आहेत.


