भोर ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन अहवालासाठी नागरिकांची हेळसांड.


भोर :- अनेक अडचणींचा सामना करत माणूस आयुष्याचा संघर्ष जिंकण्यासाठी प्रयत्न करतो. त्यातील काहीजण त्या संघर्षाची वाट अर्धवट सोडून मृत्यूपाशात अडकतात. म्हणतात ना मृत्यूनंतर सगळा संघर्ष संपतो, परंतु भोर येथील ग्रामीण रुग्णालयात मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी आलेल्या मृतांचा अहवालासाठी नातेवाईकांना संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे.

आरोग्य यंत्रणा सक्षम झाली असल्याचे एकीकडे महाराष्ट्र शासन छातीठोकपणे सांगत असले तरी, दुसरीकडे मात्र माणसाला जिवंतपणी आरोग्याच्या सोयी सुविधा मिळवण्यासाठी संघर्ष करावा तर लागत आहेच, मात्र भोर ग्रामीण रुग्णालयात माणसांना मेल्यानंतरही शवविच्छेदन अहवालासाठी नातेवाईकांना संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्त्यूचे नेमके कारण तपासकामी मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात येते आणि तसा अहवाल ग्रामीण रुग्णालय प्रशासनामार्फत नातेवाईक तसेच पोलिसांना देण्यात येतो. मात्र संबंधित व्यत्तीच्या मृत्यूनंतरही नातेवाईकांसह मृतदेहाची हेळसांड होत असल्याचा गंभीर आरोप शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते यांनी केला आहे.

ADVERTISEMENT

 

 

4ते 5 लाख लोकसंख्येचे शहर व तालुक्याचे ठिकाण असलेल्या भोर शहरांमध्ये ग्रामीण रुग्णालय आहे. राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे अपघातांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर मृत्यूची नेमके कारण तपासण्यासाठी मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात येते.

 

परिणामी नागरिकांना अहवालासाठी नाहक त्रास सहन करावा लागत आहे. या प्रकरणी योग्य ती कार्यवाही करावी अशी मागणी संतोष मोहिते यांनी केली असून तसे निवेदन उपजिल्हा रुग्णालय भोर आणि पोलीस निरीक्षक भोर यांना नुकतेच दिले आहे. व्यक्तीच्या मृत्यू तपास प्रकरणी पुढील कार्यवाहीसाठी अहवाल ग्रामीण रुग्णालय मार्फत पोलीस प्रशासनाकडे पाठवण्यात येतो. मात्र नातेवाईकांनी अहवालाची मागणी केली असता ग्रामीग रुग्णालयाकडून शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला नसल्याचे पोलीस प्रशासन सांगते तर रुग्णालय

 

प्रशासन अहवाल पोलिसांना दिल्याचे सांगत आहे. पोलीस आणि ग्रामीण सणालय प्रशासन नागरिकांना टोलवाटोलवीची उत्तर देत असल्याने शवविच्छेदन अहवाल मिळवण्यासाठी नागरिकांची हेळसांड होताना दिसत आहे. या प्रकरणी नागरिकांच्या तक्रारी वाढल्या असून भविष्यात नागरिकांना शवविच्छेदन अहवाल वेळेत न मिळाल्यास रुग्णालय प्रशासन विरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते यांनी दिला आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!