पुणे ग्रामीण चे नूतन पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांकडून स्वागत..!!


( पुणे जिल्हा) प्रतिनिधी. पुणे ग्रामीणचे नूतन पोलीस अधीक्षक म्हणून संदीप सिंह गिल यांनी मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्याकडून शनिवारी पदभार स्वीकारला आहे. संदीप सिंह गिल हे कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय आणि सर्व घटकांमध्ये सर्वांशी समन्वय मिळून मिसळून राहणारा अधिकारी म्हणून त्यांची पोलीस खात्यात ओळखले जाते. यापूर्वी ते पुणे शहर पोलीस दलात परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून जवळपास दोन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे चांगलीच चर्चेत होती. मात्र डिसेंबरमध्ये संदीप सिंह गिल यांची पोलीस अधीक्षक म्हणून पुणे ग्रामीण या ठिकाणी नियुक्ती झाली होती. संदीप सिंह गिल हे अजित दादा पवारांच्या खास मर्जीतील अधिकारी असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे त्यांना यापूर्वीही पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून पसंती देण्यात आली आहे. आजवरचे पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक म्हणून आणि मावळते पोलीस अधीक्षक पंकज देशमुख सुध्दा पदभार घेतल्यापासून नेहमीच प्रयत्नशील राहिले, आज दुपारी पोलीस अन् महसूल प्रशासनात दांडगा जनसंपर्क असणारे सातारा जिल्ह्याचे संभाजी पुरीगोसावी सातारकरांनी पुणे ग्रामीण पोलीस मुख्यालयात जयहिंद साहेब … असे म्हणत संदीप सिंह गिल यांची सदिंच्छा भेट घेतली त्यांचे स्वागत करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!