वारकऱ्यांच्या सेवेसाठी विघ्नहर्ता संस्थेचा उपक्रम 15व्या वर्षात — १६ दिंड्यांना भोजन साहित्याचे वाटप


सारोळे :-पंढरपूर आषाढी वारीसाठी निघालेल्या वारकरी दिंड्यांना सातत्याने 15व्या वर्षीही भोजन साहित्य वाटप करून विघ्नहर्ता बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली. या उपक्रमात भोर तालुक्याच्या पूर्व भागातील एकूण १६ वारकरी दिंड्यांना तांदूळ, डाळ, तेल, मसाले इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.

 

या प्रसंगी विघ्नहर्ता संस्थेचे संस्थापक मा. जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत बाठे यांनी भावना व्यक्त करताना सांगितले, “वारकऱ्यांची सेवा करण्याचे भाग्य हे पांडुरंगाच्या कृपेने मिळते. गेली 15 वर्षे आम्ही हा उपक्रम जपतोय, यातून मिळणारा आनंद हा अवर्णनीय आहे.”

ADVERTISEMENT

 

भोर येथील विघ्नहर्ता पतसंस्थेच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात दिंड्यांचे प्रमुख, सेवेकरी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी माजी सभापती सुनीताताई बाठे, विघ्नहर्ता संस्थेचे पदाधिकारी व स्वयंसेवकही उपस्थित होते.

 

सर्व उपस्थितांनी संस्थेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले. हा उपक्रम इतर संस्थांसाठी प्रेरणादायी ठरेल, असे मत काही दिंड्यांच्या प्रमुखांनी यावेळी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!