झाडाला गळफास घेऊन 35 वर्षे युवकाची आत्महत्या
प्रतिनिधी : भोर तालुक्यातील दिडघर येथे 35 वर्षे तरुणाने गळफास घेतला आहे. याबाबत राजगड पोलीस स्टेशनमध्ये भानुदास नामदेव सोंडकर वय 57 वर्ष रा.दिडघर ता. भोर जि.पुणे यांनी खबर दिली आहे.
ADVERTISEMENT
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि.16/4/24 रोजी भानुदास सोंडकर यांना घरी असताना चुलत भावाने सांगितले की तुषार राजाराम सोंडकर वय 35 वर्षे यांनी म्हसोबाच्या जवळ सागाच्या झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतला आहे. असे सांगितल्यानंतर भावकीतील 2 ते 3 लोकांना बरोबर घेऊन सदर ठिकाणी जाऊन पाहिले असता चुलत भाऊ तुषार सोंडकर यांनी सागाच्या झाडाच्या फांदीला नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन लटकत असल्याचे पाहिले. त्यानंतर त्यास तत्काळ खाजगी वाहनाने सिद्धिविनायक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. डॉक्टर नी तपासले असता सकाळी 9 वाजता मयत घोषित केले. पुढील तपास सहा. फौज ढावरे करीत आहेत.


