जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.
मंगेश पवार
सारोळे : जि प प्राथ शाळा न्हावी शाळेत 19 फेब्रुवारी 2025 रोजी शिवजयंती सोहळा साजरा करण्यात आला.
सकाळी 8:30 वाजता शिवजयंती सोहळ्याला जि.प.प्राथ.शाळा न्हावी शाळेतून सुरुवात झाली.तदनंतर न्हावी 322 गावात व न्हावी 15 गावात शिवजयंती सोहळा मिरवणूक काढण्यात आली.जागोजागी रांगोळ्या काढून शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे व पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
सोहळ्यात सर्वांनीच उस्फुर्त सहभाग घेऊन शिवजयंती सोहळ्याची शोभा वाढवली.महिलांनीही सहभाग घेऊन दारासमोर रांगोळ्या काढून पालखी सोहळ्याचे स्वागत करून चौकाचौकात औक्षण केले,शिवजयंती सोहळ्यानिमित्त विध्यार्थ्यानी विविध गाण्यांवर नृत्य सादर केले.
विजय चव्हाण यांनी कार्यक्रमासाठी घोडा व वाद्यसंच साहित्य मोफत देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली.
कु.वरदराज अमोल सोनवणे इयत्ता 4 थीचा विद्यार्थी छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेत घोड्यावर विराजमान सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.
यावेळी विध्यार्थ्यांना छत्रपती प्रतिष्ठान न्हावी 15,नारायण लक्ष्मण सोनवणे,रणजित सोनवणे यांचेकडून खाऊ वाटप करण्यात आला.
यावेळी अंकुश चव्हाण, विद्यमान चेअरमन, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी यांचेमार्फत ग्रामस्थ व विद्यार्थी यांना महाप्रसादाचा आस्वाद देणेत आला.
कार्यक्रम संयोजन संदीप मोरे, अनिल चाचर,श्रीम रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, उर्मिला भूतकर, गीतांजली पाटील यांनी केले.


