न्हावी शाळेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ५०,००० रुपयांचा धर्मादाय निधी
मंगेश पवार
सारोळे (ता. भोर) प्रतिनिधी –महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस नुकताच नाबार्डकडून मिळालेला “उत्कृष्ट जिल्हा बँक पुरस्कार” या दोन्ही पार्श्वभूमीवर न्हावी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस ५०,००० रुपयांचा धर्मादाय निधीचा धनादेश प्रदान करण्यात आला.
हा निधी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्यादित, पुणे यांच्या धर्मादाय खात्यातून देण्यात आला असून, बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते शाळेला धनादेश सुपूर्त करण्यात आला.
कार्यक्रमानिमित्त न्हावी येथील न्यू इंग्लिश स्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थी आनंदित झाले असून परिसरात उत्साही वातावरण पाहायला मिळाले.
भालचंद्र जगताप यांनी यावेळी बोलताना सांगितले, “पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ग्रामीण भागातील शैक्षणिक संस्थांना सातत्याने मदत दिली जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा मिळण्यास हातभार लागतो. समाजोपयोगी कार्याची ही परंपरा बँक कायम ठेवणार आहे.”
या कार्यक्रमास भरत सोनवणे, शितल सोनवणे, सीमा जगताप, राजेंद्र सोनवणे, नवनाथ सोनवणे, अजित शिंदे, सत्यजित जगताप, शैलेश जगताप, शरद सोनवणे, संजय ताम्हाणे, स्मिता लाडे, संदीप मोरे, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक अनिल चाचर यांनी केले,सूत्रसंचालन अनिता पोतेकर यांनी पार पाडले,तर आभारप्रदर्शन संपत्ती कोळी यांनी केले.
या उपक्रमामुळे न्हावी गावात आनंदाचे व उत्साही वातावरण निर्माण झाले असून, शाळा व्यवस्थापन व ग्रामस्थांनी बँकेचे आभार मानले आहेत. भविष्यातही अशा प्रकारचे उपक्रम होत राहावेत, अशी अपेक्षा उपस्थितांनी व्यक्त केली.


