मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आळंदीत महारक्तदान शिबिराचे आयोजन नवयुवकांचा उत्स्फूर्त सहभाग; विविध मान्यवरांची उपस्थिती
पुणे / प्रतिनिधी –
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त देवाची आळंदी येथे महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमात युवकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला असून, शिबिरात मोठ्या प्रमाणावर रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली गेली.
या शिबिराचे आयोजन आळंदी नगर परिषदेच्या अध्यक्षतेखाली पार पडले. कार्यक्रमास प्रमुख उपस्थिती म्हणून अभिजीत उमरगेकर, प्रकाश भालेकर, सूर्यकांत भालेकर, अमोल सर यांची उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे सूर्यगीत अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी केलेले सक्रिय सहकार्य. त्यांनी जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवून, रक्तदानाचे महत्त्व पटवून दिले. यामध्ये लोकप्रतिनिधींनी, शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी व विद्यार्थ्यांनी भेट देत सहभाग नोंदवला.
रक्तदान शिबिरात वैद्यकीय पथकाच्या देखरेखीखाली सुरक्षितपणे रक्त संकलन करण्यात आले. यावेळी रक्तदानासंबंधी माहिती देणारे फलक, बॅनर, पम्फ्लेट्स यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.
या उपक्रमामुळे युवकांमध्ये सामाजिक जाणीवा जागृत होत असून, पुढील काळात अशा विधायक उपक्रमांची मालिका सुरू ठेवण्यात येणार असल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले.


