केंद्रप्रमुख सुरेखा जाधव यांचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज: शंकर माने

ADVERTISEMENT

चाफळ श्रीराम मंदिर (समर्थ सभागृह) चाफळ येथे पंचायत समिती पाटण व शिक्षकवृंद चाफळ बीट आयोजित केंद्र वागजाईवाडी केंद्रप्रमुख. सुरेखा दिलीप जाधव यांची सेवापूर्ती गौरव समारंभ आयोजित करण्यात आला. प्राथमिक शिक्षक ते केंद्रप्रमुख असे 38 वर्षे 6 महिने प्रदीर्घ सेवेनंतर 30 जून 2025 रोजी त्या सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. एच. व्ही. जाधव साहेब सेवानिवृत्त सहाय्यक संचालक पुणे, माजी शिक्षण सभापती जि.प. सातारा मा. राजेश पवार साहेब तसेच मा. के.एल. पठारे साहेब सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी ठाणे व गटशिक्षणाधिकारी पं. स. पाटण मा. दीपा बोरकर मॅडम शिक्षणविस्तार अधिकारी मा. देशमाने मॅडम, माजी केंद्रप्रमुख सुरेश चव्हाण साहेब , अर्जुन पाटील साहेब, केंद्रप्रमुख पी. एम. पवार साहेब व सुरेश मगर साहेब मा. नांगरे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच जि.प. शाळा मधलीवाडी विद्यार्थिनी वेदिका पवार हिने आपले मनोगत व्यक्त केले, शिक्षकवृंद चाफळ बीटातील सर्व शिक्षकांकडून मा. सुरेखा दिलीप जाधव मॅडम सहकुटुंब गौरव करण्यात आला. केंद्रप्रमुख सुरेखा जाधव मॅडम यांनी चाफळ वागजाईवाडी,केळोली, जाळगेवाडी, जाधववाडी ,दाढोली या शाळांमध्ये विद्यार्थी घडवण्यासाठी गुणवत्तेला प्रथम प्राधान्य देऊन काम केले. उपस्थित सर्व मान्यवरांनी शिक्षक विद्यार्थी यांनी आपल्या मनोगतातून जाधव मॅडम यांना शुभेच्छा दिल्या. सत्कार समारंभास उत्तर देताना सत्कारमूर्ती जाधव मॅडम आपल्या मनोगतात म्हणाल्या,” शिक्षक ते केंद्रप्रमुख पदावर काम करत असताना मी प्रामाणिकपणे विद्यार्थी गुणवत्ता ध्येय डोळ्यासमोर ठेवून काम केले, त्यामुळे आज मी निवृत्तीच्या क्षणी पूर्ण समाधानी आहे”. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश पोतदार सर सूत्रसंचालन मुजुमले सर व आभार माजी सरपंच डेरवण पांडुरंग यादव यांनी मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!