मेणवली येथे विवाहितेला आणि तिच्या भावाना कोयत्याच्या मुठीने मारहाण, पोलीसात तक्रार दाखल .
वाई प्रतिनिधी : आशिष चव्हाण
ADVERTISEMENT
वाई तालुक्यातील मेणवली येथील अक्षदा अजय चौधरी वय २० हिने लग्नाला यायचे आहे असे म्हणले असता पतीने तुला कोण ओळखत नाही तु येवू नको असे म्हणाल्याने ती रागाने माहेरी निघून गेली. तिला दि. २८ एप्रिल रोजी रात्री पावणे नऊ वाजता मेणवली येथे सासरी सोडण्यासाठी तिचा भाऊ अभिषेक आणि आई आले असता तिच्या पतीने कोयत्याच्या मुठीने तिच्या भावाच्या नाकावर, कपाळावर मारुन जखमी केले. तसेच सासू मंगल हिने ही अक्षदा हिला लाथाबुक्यांनी मारहाण केली. म्हणून पती अजय चौधरी व मंगल बाजीराव चौधरी याच्यावर दि. २९ एप्रिल रोजी रात्री १२.४१ मिनिटांनी वाई पोलिस स्टेशन मध्ये तक्रार दिली आहे.

 
			

 
					 
							 
							