पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून संचालक भालचंद्र जगताप यांच्या हस्ते आपटी माध्यमिक विदयालयास धनादेश सुपूर्द.


संपादक : मंगेश पवार

भोर एज्युकेशन सोसायटीचे माध्यमिक विद्यालय आपटी येथे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांनी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्यांनी विद्यालयाच्या बांधकामासाठी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धर्मादाय निधीतून 50 हजार रुपयांचा धनादेश उपलब्ध करून दिला आणि भविष्यात सुद्धा मदत करण्याचे आश्वासन दिले. त्याप्रसंगी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. घोडके तसेच वाडकर सर आणि कदम सर व इतर कर्मचारी उपस्थित होते. शाळा व्यवस्थापन आणि ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करून भालचंद्र जगताप यांचे तसेच बँकेचे आभार मानण्यात आले.

ADVERTISEMENT

त्यानंतर भालचंद्र जगताप यांनी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आपटी शाखेस सदिच्छा भेट देऊन बँकेच्या कामकाजाबद्दल आढावा घेतला. यावेळी समवेत भोर तालुका खरेदी-विक्री संघाचे संचालक सोमनाथशेठ सोमाणी, भोर शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल धुमाळ, पाले गावचे उपसरपंच राजेश खोपडे यांच्यासह आपटी गावचे जेष्ठ जानु पारठे, विकास सोसायटीचे चेअरमन जगन्नाथ पारठे, मा. सरपंच रघुनाथ पारठे, आबा पारठे, सुनील पारठे, बाळासाहेब गाडे, यशवंत आलगुडे, बँक विकास अधिकारी शामराव घोणे, बँकेचे शाखा व्यवस्थापक मोरे साहेब, अमित गावडे, हर्षल गाडे आदी बँक कर्मचारी, सोसायटीचे सचिव शंकर भोजने, विठ्ठल पारठे, विजय किंद्रे आणि स्वप्नील दळवी उपस्थित होते.

ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचा सत्कार करण्यात आला त्याबद्दल सर्वांचे आभार.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!