कापूरव्होळ भुयारी मार्गात पाणी साचल्याने नागरिकांचे हाल


 

कार्यकारी संपादक : सागर खुडे

कापूरहोळ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वरील कापूरहोळ येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावर पाणी साठून राहून होत आहेत नागरिकांचे हाल.

गेली दोन ते तीन वर्षांपासून राष्ट्रीय महामार्ग रिलायन्स अधिकारी राकेश कोळी यांच्याशी स्थानिक ग्रामस्थांनी पाठपुरावा करून देखील या अधिकाऱ्यांना ते पाणी काढण्यासाठी मोठे आव्हाहन असल्याची चर्चा सध्या कापूरहोळ येथील नागरिक व प्रवाशी यांच्यात रंगू लागली आहे.

कापूरहोळ येथील सरपंच पंकज गाडे यांनी वेळोवेळी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व कर्मचारी त्याचबरोबर रिलायन्स अधिकारी राकेश कोळी यांच्याशी वेळोवेळी कित्येक वर्षे पाठपुरावा करून देखील हे अधिकारी कसल्याही प्रकारे लक्ष्य देत नाही एखादी घटना घडण्याची वाट पहात आहेत का असा सवाल त्यांनी आज सोशल मीडियाद्वारे करुन नाराजी व्यक्त केली आहे.

कापूरहोळ चौकामध्ये देखील मोठ मोठे खड्डे पडले आहेत त्याच बरोबर रस्त्यांच्या दुतर्फा बाजूने कसल्याही प्रकारे गटारांची व्यवस्था केली गेली नाही त्यामुळे त्या ठिकाणी जास्त प्रमाणात पाणी साठून प्रवाशी व स्थानिक ग्रामस्थांना नाहक असा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत देखील कापूरहोळ ग्रामस्थांनी राष्ट्रिय महामार्ग अधिकारी यांना सांगितले होते परंतु आज करू,उद्या करू, जे सी बी अवेलेबल नाही,गटारे काढायला पोलीस बंदोबस्त हवाय तो मिळत नाही,आता गटारे काढायला पण पोलीस बंदोबस्त लागत आहे असली उडवावूडविची कारणे देऊन पळ काढत आहेत. व वेळ पुढे सारून नेण्याचे काम याठिकाणी चालल्याचे चित्र याठिकाणी दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

या सदर विषयात कापूरहोळ येथील भुयारी मार्गातील पाणी काढण्यासाठी सचिन जैन यांनी 4 दिवसाचा अवधी मागितला आहे येत्या 4 दिवसांत त्या भुयारी मार्गात काँक्रिट टाकून भरून घेतले जाईल अशी माहिती दिली आहे.

त्याच बरोबर रिलायंस अधिकारी राकेश कोळी यांच्याशी संपर्क साधला असता नेहमी प्रमाणे / दरवर्षी प्रमाणे त्यांचे एकच उत्तर मिळाले पाऊस उघडला की करून घेऊ असे ते गेली दोन ते तीन वर्षांपासून एकच उत्तर देतात परंतु असे पावसाळे किती उघडून गेले पण त्यांच्याच्याने काय ते काम झाले नाही.

 

 

 

सदर विषयात कापूरहोळ ग्रामस्थांची राष्ट्रिय महामार्ग अधिकारी यांच्याकडे मागणी अशी आहे की भुयारी मार्ग शाळकरी मुले व नागरिक यांना सोयीचा करून द्यावे. रस्त्यांच्या दुतर्फा बाजूने गटारांची व्यवस्था करावी. व सर्व्हिस रोड व मेन रोड वरील खड्डे पडलेले आहेत ते तात्काळ भरणे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!