भोर तालुक्यातील टिटेघर गावातील रामेश्वर मंडळाची पर्यावरणपुरक सजावट.


 

कार्यकारी संपादक : सागर खुडे

 

भोर प्रतिनिधी : शिवछत्रपतींचे पदस्पर्शाने पावन झालेल्या रायरेश्वर चे पायथ्याशी असलेल्या टिटेघर गावातील रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गणेशोत्सवामधे यंदा सजावट म्हणून वडाचे पानांनी बनवलेल्या द्रोण पत्रावळ्यांचा वापर करुन भव्य दिव्य अशि सजावट केलीय.या सर्व सजावटिसाठी १००० द्रोण व ९०० पत्रावळी लागल्या ही सुंदर सजावट वीसगाव खोर्यातील गणेशभक्तांचे अकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेली आहे.अनेक गणेशभक्तांनी टिटेघर येथे जावून या सजावटिचे अकर्षणाचा व वेगळेपनाचा अनुभव घेतला.

ADVERTISEMENT

दरवर्षी नित्य व वेगळे ऊपक्रम राबवण्याचा पांयंडा रामेश्वर सेवा व क्रिडा मंडळाने गेली ३५ वर्षे जोपासलेली आहे.गणेश मुर्तीवर राजेंद्र वाडकर यांनी केलेले सुंदर डायमंड वर्क अनेक गणेशभक्तांना भावले .मंडळाचे संस्थापक शंकर तुकाराम सणस,अध्यक्षदत्तात्रेय लक्ष्मण सणस, उपाध्यक्ष – संतोष जगन्नाथ नवघणे यांचे नेत्रुत्वात मंडळ एका चांगल्या दिशेने मार्गाक्रमण करत असल्याची ग्वाही अनेक गणेशभक्तांनी दिलीय.

मंडळानी व कार्यकर्त्यांनी केलेला हा नाविन्यपुर्ण ऊपक्रम म्हणजे कलेचा आखीव-रेखीव देखावा आणि विज्ञानाचे ऊत्तम अविष्कार यांची सांगड घालून पर्यावरणहित जोपासण्याचे ऊत्तम ऊदाहरण असल्याची चर्चा पंचक्रोशित आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!