जलनायक स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांच्यादुतीय पुण्यस्मरणार्थ! भव्य शेतकरी मेळावा.
सातारा प्रतिनिधी : बजरंग चौधरी
केळघर : स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेब यांच्या स्मृतिदिना निमित्त बोंडारवाडी धरण कृती समितीच्या वतीने ५४ गावचा भव्य शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे सदर मेळाव्यास श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे यावेळी आ. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे मार्गदर्शन होणार आहे तसेच तालुक्यातील सर्व आजी माजी पदाधिकारी विविध संस्थेचे चेअरमन ,व्हा.चेअरमन संचालक , सरपंच , उपसरपंच , महिला मंडळ मुंबई , पुणे येथील पदअधिकारी उपस्थित राहणार आहेत जावळी तालुक्यातील सर्वसामान्य शेतकरी संघटित करून स्वर्गीय विजयराव मोकशी साहेब बोंडारवाडी धरण व्हावे व शेतकऱ्यांच्या शेतात पाणी पोचले तरच शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकास होईल हे स्वप्न दाखवणारे स्वर्गीय विजयराव मोकाशी साहेबांची द्वितीय पुण्यस्मरण कार्यक्रम शुक्रवार दिनांक २० सप्टेंबर २०२४ रोजी ठीक ११ वाजता स्वामी समर्थ मंगल कार्यालय नांदगणे केळघर येथे होणार असून या कार्यक्रमास ५४ गावातील बहुसंख्य लोकांनी उपस्थित राहावे असेआव्हान आदिनाथ ओंबळे यांनी केले आहे


