किकवी गावातील ग्रामस्थांची आमदार संग्राम थोपटे आणि अधिकाऱ्यांशी विविध विकास कामांसाठी भेट.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
किकवी गावातील ग्रामस्थांनी भोर,राजगड, मुळशीचे कार्यसम्राट आमदार संग्राम थोपटे यांची किकवी गावातील विविध विकास कामावर चर्चा करण्यासाठी भेट घेतली.
यावेळी आमदार संग्राम थोपटे यांनी भोर तहसीलदार, प्रांत, NHI चे सर्व अधिकारी, राजगड पोलीस अधीकारी यांच्याशी चर्चा केली.
ADVERTISEMENT
किकवी येथील पोलीस चौकी हटवून त्वरित ऑफिस कंटेनर देणे, अंडरपास ब्रिजचे काम चालू करणे, सर्विस रोडचे खड्डे भरून देणे या कामासाठी सकारात्मक चर्चा झाली.
यावेळी आमदार संग्राम थोपटे, राजगड पोलीस, किकवी गावातील भोर युवक सदस्य चेतन कोंढाळकर, तंटामुक्ती अध्यक्ष किरण घारे, सरपंच नवनाथ कदम, मा. सरपंच नवनाथ भिलारे,मौलादीन शेख, ग्रामसेवक विजय गेजगे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

 
			

 
					 
							 
							