न्हावी गावातील “ज्ञानेश्वर सोनवणे”यांची एमपीएससी भरती अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण अधिकारी पदाला गवसणी.


 

दि. २२ सारोळे : न्हावी गावातील स्वर्गीय मोहन सोनवणे यांचे पुतणे आणि न्हावी विकास सोसायटीचे युवा चेअरमन नवनाथ मोहन सोनवणे यांचे चुलत बंधू ज्ञानेश्वर विलास सोनवणे यांची नुकतीच सरळ सेवा भरती अंतर्गत महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण अधिकारी पदी निवड झाली.

त्याबद्दल त्यांचा न्हावी आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभ शनिवार दि. २१ रोजी संपन्न झाला.

 

प्रसंगी उत्स्पुर्तपणे ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वरची गावच्या प्रवेशद्वारापासून भव्य मिरवणूक काढून कौतुक करण्यात आले. महिलांनी ठिकठिकाणी ओवाळून ज्ञानेश्वरचे स्वागत करून शुभेच्छा दिल्या.

 

ज्ञानेश्वरच्या घरची परिस्थिती सधन शेतकरी – बागायतदार असली तरी सुद्धा त्याने पारंपारिक शेती व्यवसायाकडे ओढा न दाखवता अधिकारी होण्याची जिद्द मनात ठेवून दिवसरात्र मेहनत केली व शेवटी महाराष्ट्र राज्य सरळ सेवा अंतर्गत घेतल्या जाणाऱ्या परीक्षेत घवघवीत यश मिळवून महाराष्ट्र नगर परिषद कर निर्धारण अधिकारी पदाला गवसणी घालून चुलते स्वर्गीय मोहन सोनवणे, वडील विलास सोनवणे, आई, भावांच्या बरोबर स्वतःचे आणि कुटुंबियांचे स्वप्न सत्यात उतरवून त्याच्या कष्टाचे चीज केले. याकामी त्याचे शिक्षक आणि सर्व कुटुंबाने ज्ञानेश्वरला सर्वोतोपरी मागर्दर्शन केले. तरी न्हावी आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने ज्ञानेश्वर वर अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

ADVERTISEMENT

 

न्हावी आणि पंचक्रोशीतील समस्त ग्रामस्थांच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक माननीय भालचंद्र जगताप यांच्या हस्ते ज्ञानेश्वरचा सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी राजगड सहकारी साखर कारखान्याचे संचालक के. डी. भाऊ सोनवणे, शिवसेनेचे भोर तालुक्याचे नेते कुलदीप कोंडे, भोर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस किसान सेलचे अध्यक्ष राजेंद्र सोनवणे, युवा नेते आणि उद्योजक विकास चव्हाण यांच्यासह न्हावी आणि पंचक्रोशीतील बहुसंख्य सरपंच – उपसरपंच त्यांचे सर्व सहकारी, न्हावी विविध विकास सहकारी सोसायटीचे चेअरमन नवनाथ सोनवणे, व्हा. चेअरमन लव्हा चव्हाण यांच्यासह जेष्ठ संचालक अंकुश चव्हाण, बाळासाहेब सोनवणे आणि सर्व संचालक मंडळ आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी भालचंद्र जगताप यांनी मनोगत व्यक्त करताना ज्ञानेश्वरचे अभिनंदन करून त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच तरुणांनी ज्ञानेश्वरचा आदर्श समोर ठेवून महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग – सरळ सेवा भरती आदी परीक्षेचा अभ्यास करून अधिकारी होण्यासाठी प्रयत्न करावा असे आवाहन केले. तसेच बॅंकेतर्फे उच्च शिक्षणासाठी असणाऱ्या योजनांची माहिती देवून तरुणांना अडचणीच्या वेळी स्वतः सुद्धा सर्वोतोपरी मार्गदर्शन करून त्यांच्या उज्वल भविष्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले. प्रसंगी अनिल सोनवणे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!