डॉ.मंदार माळी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर यांचा यशस्वीपणे १२०० डिलिव्हरीचा टप्पा पार.


कार्यकारी संपादक:  सागर खुडे

दि. २२ भोर : अतिशय प्रतिकूल परिस्थितीत १०८ रुग्णवाहिकेतून पेशंटला सरकारी दवाखान्यात ऍडमिट करत तब्बल १२०० गरोदर महिलांच्या प्रसुती करण्यात किकवी येथील डॉ.मंदार माळी यांना यश आले.

इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर यांचा १२०० डिलीवरी पूर्ण करताना अगदी चौफेर शिरवळ,सातारा, भोर,पसुरे,भूतांडे,किकवी,मोरवाडी,
बांदलवाडी,माहूर,वीर, अंबवडे,न्हावी, वाठार, अशा विविध
ठिकाणी यशस्वीपणे प्रसूती केल्या आहेत. या कामात त्यांना ॲम्बुलन्स वरील ड्रायव्हर दामोदर अहिरे, सुधीर मांढरे, विशाल कदम यांनीही मोलाची मदत केली आहे. रात्री अपरात्री येणाऱ्या फोनवर लगेच डिलिव्हरी पेशंटला 108 ॲम्बुलन्स ने सरकारी दवाखान्यांमध्ये ऍडमिट करून घेतात.
मंदार माळी यांना पंचक्रोशी मध्ये सुव्यवस्थेत सुरळीतपणे डिलिव्हरी केल्याने कौतुक केले जात आहे.

गर्भवती महिलांची प्रसूती सामान्य झाली असेल तर ते त्यांच्यासाठी चांगलं ठरतं, कारण यामध्ये त्यांच्या शरीराला फारशी इजा होत नाही. पण महिलांना नॉर्मल डिलिव्हरी मध्ये खूप वेदना सहन कराव्या लागतात. त्यामुळे हल्ली अनेक महिला स्वतःहून सिजेरियन डिलिव्हरीचा पर्याय निवडत आहेत. अर्थात सिजेरियन प्रसूतीमध्ये वेदना होत नाहीत परंतु प्रसूतीनंतर अनेक समस्या उद्भवतात आणि त्यासाठी विशेष काळजी घेणे आवश्यक असतं. विशेषता टाक्यांची काळजी घ्यावी लागते, अन्यथा टाक्यांमध्ये संसर्ग होऊ शकतो.
डॉ.मंदार माळी इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर

 

डॉ.मंदार माळी हे भोंगवली पी.एस.सी. मार्फत डिलिव्हरी महिलांना योग्य ती काळजी घेऊन प्रसूती कोणतीही अडचण न येता करतात. किकवी गावात तसेच पंचक्रोशी मध्ये डॉ.माळी खूप छान पद्धतीने काम करतात. अशाच त्यांच्या हातून गोरगरीब महिला भगिनींच्या प्रसूती झाल्या पाहिजेत.

नारायण भिलारे, कामगार नेते

विद्यमान संचालक विघ्नहर्ता पतसंस्था किकवी


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!