डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी करावी! उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रामदास कांबळे.
शिरवळ प्रतिनिधी : मानव जातीचे उद्धार करते महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 133 वी जयंती राज्यात आणि देशातही मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. त्या अनुषंगाने सातारा जिल्ह्यातील आंबेडकरी जनतेने भीम जयंती मोठ्या आनंदात आणि शांततेत विविध उपक्रम राबवून साजरी करावी. असे आवाहन उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हा समन्वयक रामदास कांबळे यांनी केले आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विद्वतेपुढे अवघे जग नम्रपणे नतमस्तक आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती भारत देशासह अन्य देशातही साजरी होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजे आपल्यासाठी सर्वात मोठा सण आहे. प्रत्येकाने घरावर निळा ध्वज, विद्युत रोषणाई, मिरवणुकीत विविध देखावे आणि विविध उपक्रम राबवावेत. जयंतीत मिरवणुकीत कोणत्या प्रकारची कसर राहणार नाही याची दक्षता आणि काळजी घ्यावी. खास करून जयंती उत्सव समिती यांनी अधिक लक्ष घालावे. असे आव्हान उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते रामदास कांबळे यांनी केले आहे.


