बालवडीत बैलगाडीतून मतदार जनजागृती मोहिम.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
मतदान हा प्रत्येक नागरिकाचा महत्वाचा अधिकार आहे.त्यामुळे मिळालेल्या या अधिकाराचा वापर प्रत्येक भारतीय नागरिकाने करावा आणि मतदानाचे कर्तव्य पार पाडावे याच पार्श्वभूमीवर आगामी लोकसभा निवडणुकीत मतदानाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी व मतदारांच्या मतदान जागरूकतेला चालना देण्यासाठी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी ३५ बारामती लोकसभा मतदान संघ अंतर्गत २०३ भोर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी भोर राजेंद्र कचरे आणि तहसिलदार सचिन पाटील यांनी दिलेल्या आदेशानुसार काल रोजी बालवडीतील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी भिमराव शिंदे यांनी शालेय विद्यार्थ्यांसमवेत बैलगाडीतून मतदान जागृतीचे फलक दाखवून गावातून मिरवणूक काढून मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी अनोख्या पध्दतीने मतदार जागृती केली.
मुख्याध्यापक भिमराव शिंदे शिक्षक महादेव बदक आनंदा सावले अंजना कोंढाळकर आणि विद्यार्थी या मोहिमेत सहभागी होते.


