वाईचे आमदार मंकरदआबा पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेटमंत्री पदी निवड झाल्याबद्दल मा.जि.प.अध्यक्ष उदय कबुले, आदेश भापकर यांनी अभिनंदन केले.
संपादक : मंगेश पवार
शिरवळ : वाई २५६ हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या २८८ मतदारसंघांपैकी एक आहे. लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघ परिसीमन आदेश, २००८ नुसार केलेल्या मतदारसंघांच्या रचनेनुसार,
वाई मतदारसंघात सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा आणि महाबळेश्वर या तालुक्यांचा समावेश होतो. वाई हा विधानसभा मतदारसंघ सातारा लोकसभा मतदारसंघात मोडतो.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मकरंद आबा पाटील हे वाई विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत.२०२४,२०१९ ,२०१४ , राष्ट्रवादी पक्षाकडून तर २००९ मकरंदआबा पाटील अपक्ष निवडून आले होते
कॅबिनेट मंत्री पदी निवड झाल्या बद्दल उदय दादा कबुले सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष आदेश शेठ भापकर उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस सातारा जिल्हा मा.उपसंरपच शिरवळ यांनी आबा चे अभिनंदन केले