सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची भेट.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा. श्री. सुनील काशिनाथ चांदेरे व संचालक मंडळाने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस भेट दिली. निमित्त होते सिंधुदुर्ग जिल्हा अभ्यास दौरा . यावेळी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष श्री. मनीष दळवी यांनी अभ्यास दौऱ्यातील सदस्यांचे स्वागत करुन त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व गोमय गणेशमुर्ती भेट दिली.
उपाध्यक्ष सुनील चांदेरे व संचालक माऊली दाभाडे यांनी यावेळी पुणे जिल्हा बॅंकेची माहीती आपल्या भाषणात दिली. चेअरमन मनिष दळवी यांनी सिंधुदुर्ग बॅंकेची माहीती आपल्या भाषणात दिली.
अभ्यास दौऱ्यातील सदस्यांनी बँकेच्या विविध योजनांची माहिती घेतली. प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम यासारख्या शासकीय योजना सिंधुदुर्ग जिल्हा बँक यशस्वीपणे राबवत असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची सोशल मिडीया सारखी वेगळी योजना पुणे जिल्हा बँकेमध्ये राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. पुणे जिल्हा बँकेचा व्यवहार जरी मोठा असला तरी सिंधुदुर्ग जिल्हा बँकेने केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगितले. सिंधुदुर्ग बँकेने दुग्ध वाढीसाठी केलेले प्रयत्न, मायक्रो फायनान्स, जिल्ह्यातील प्राथमिक विकास संस्थाना दिले जाणारे अर्थसहाय्य, गटसचिव यंत्रणा तसेच विकास संस्थातील अनिष्ट तफावत कमी करण्यासाठी बँकेने राबविलेल्या योजनांबाबत माहिती घेतली. एकंदरीत या अभ्यास गटाने बँकेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने यापूर्वी पुणे जिल्हा बँकेला भेट दिलेली आहे.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपाध्यक्ष मा.सुनील काशिनाथ चांदेरे ,संचालक सर्वश्री मा. रेवणनाथ कृ. दारवटकर, मा. ज्ञानोबा सा. दाभाडे, मा. दत्तात्रय म. येळे, मा. संभाजी ना. होळकर, मा. भालचंद्र गुलाबराव जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिरुद्ध देसाई, उपसरव्यस्थापक श्री. सुनिल खताळ, जिल्हा बँकेचे संचालक श्री. समीर सावंत, श्री. विद्याधर परब, श्रीम. नीता राणे व श्री. संदिप उर्फ बाबा परब तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. प्रमोद गावडे तसेच बँकेचे सरव्यवस्थापक, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.