संविधान दिवसानिमित्त नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांचा सत्कार
मंगेश पवार
दि. 26 भोर :-पंचायत समिती भोर येथे नवनियुक्त गटविकास अधिकारी मा. चंद्रकांत विपट यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे स्वागत प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आले. संविधान दिनाचे औचित्य साधत मा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतीकात्मक प्रतिमा प्रदान करून त्यांना संविधान दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या.
ADVERTISEMENT
या वेळी विस्तार अधिकारी मा. बबन चखाले, रियटर इंडिया प्रा. लि. चे अधिकारी मा. सुभाष पाचर्णे , तसेच शंकर मोहिते उपस्थित होते. पंचायत समिती भोर येथील सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत संविधान दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमास प्रहार जनशक्ती पक्ष, भोर तालुक्याचे अध्यक्ष अजय कांबळे यांची विशेष उपस्थिती होती.


