शिरवळ येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्ते अॅड. अरुण जाधव यांचे जल्लोषात स्वागत
मंगेश पवार
शिरवळ (ता. खंडाळा, जि. सातारा) येथे वंचित बहुजन आघाडीचे महाराष्ट्र राज्य प्रवक्ते तसेच जामखेड नगरपरिषदेचे विद्यमान नगरसेवक अॅड. अरुण जाधव यांचे फटाक्यांच्या आतिषबाजीने व जल्लोषात स्वागत करण्यात आले.
यावेळी सातारा जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे, खंडाळा तालुकाध्यक्ष बापूसाहेब खुंटे, सुरेश जावळे, संतोष ढमाळ, समता सैनिक दलाचे राजेंद्र तायडे, सौरभ कांबळे, विजय कांबळे यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
ADVERTISEMENT
कार्यक्रमात मार्गदर्शन करताना अॅड. अरुण जाधव यांनी येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका वंचित बहुजन आघाडीने संघटित ताकदीने लढवाव्यात, असे आवाहन केले. संघटन वाढ, तळागाळातील प्रश्न आणि बहुजनांच्या हक्कांसाठी निर्णायक लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.


