पुणे ते सातारा महामार्ग वरती कोंढणपूर ब्रिज वरती ट्रकला पाठीमागून येणाऱ्या ट्रकची धडक.
खेडशिवापूर प्रतिनिधी : पुणे ते सातारा जाणाऱ्या महामार्गावर दि.13/4/24 रोजी पहाटे 3:30 वाजता चे सुमारास निर्मल ट्रान्सपोर्टचा ट्रक ड्रा. विश्वास श्रीरंग पवार वय 35 यांनी अशोक लेलँड ट्रक क्र. MH 04 M 4965 हा भिवंडी ते इचलकरंजी येथे घेऊन जात असताना खेड शिवापुर हद्दीत कोंढणपूर फाट्याच्या ब्रिजच्या अलीकडे त्याच्या ताब्यातील ट्रक रहदारीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून भरधाव वेगात चालवून समोरील चालणाऱ्या ट्रकवर आदळून अपघात केला.त्यामध्ये ट्रक ड्रायव्हर विश्वास पवार यांच्या डाव्या पायास व पोटास किरकोळ व गंभीर दुखापत झाली. यामुळे निर्मल वेअर हाऊस अँड ट्रान्सपोर्ट एलएलपी भिवंडी यांच्या मच्छिंद्र रामभाऊ तोत्रे वय 52 वर्ष यांनी ट्रक ड्रायव्हर विश्वास पवार यांच्या वरती राजगड पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दाखल केली आहे.
याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. ना. जाधव करीत आहेत.


