सुर्यगीत अँकँडमीत रक्षाबंधन साजरा
एस.एन.नांदेडकर
पुणे / देवाची आळंदी :- देवाची आळंदी नगरीतील सुर्यगीत करिअर अँकँडमीत दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलीस भरती पूर्व तयारी करणा-या विद्यार्थिनीच्यावतीने संचालक सुर्या सर यांच्या संकल्पनेतून रक्षाबंधनानिमित्त ‘खाकी हिच राखी’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
प्रथमत: सुर्या सरांनी राखीपौर्णिमा रक्षाबंधनानिमित्त बहिणी भावांना राखी बांधून त्यांच्या भरभराटीची, उत्तम आरोग्याची आणि सुखी आयुष्याची सदिच्छा व्यक्त करतात, तर भाऊ बहिणींना भेटवस्तू देऊन त्यांच्या सदैव पाठीशी राहून त्यांचं रक्षण करण्याचं वचन देतात. असे म्हणाले.
यावेळी सूर्यगीत अँकँडमीचे सर्व शिक्षक,विद्यार्थी, विद्यार्थीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आमच्या भावानी आमची रक्षा करावी, हीच आमची अपेक्षा, असे सांगून विद्यार्थींनीने शुभेच्छा दिल्या व आदर व्यक्त केला तद्नंतर कार्यक्रमाची सांगता झाली.

			
