खेड शिवापुर टोल नाका परिसरातील ड्रेनेज लाईन उघडी; नागरिक व प्रवासी त्रस्त,
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क
खेड शिवापुर – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गावर खेड शिवापुर टोल नाका परिसरात असलेली ड्रेनेज लाईन दीर्घकाळापासून उघडीच सोडण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
दुर्गंधी आणि असह्य वासामुळे प्रवासी त्रस्त झाले असून, विशेषत: पावसाळ्यात पाणी साचून आजूबाजूला घाण पसरते. त्यामुळे डास, माशा व अन्य किडे वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.
ड्रेनेज लाईन उघड्यावर सोडल्यामुळे नागरिकांमध्ये दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे अनेक आजार होऊ शकतात, हे नाकारता येत नाही. त्यामुळे संबंधित विभाग किंवा ठेकेदार यांनी याची तात्काळ दखल घेऊन पाईपलाईन बंदिस्त करावी, जेणेकरून ग्रामस्थ व जनतेला दुर्गंधीपासून त्रास होणार नाही, अशा सोयी कराव्यात.
शिव प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांनी माहिती देत इशारा दिला आहे की, तात्काळ कारवाई न झाल्यास शिव प्रहार प्रतिष्ठानच्या वतीने काही दिवसांत टोल नाका येथे जनआंदोलन उभे केले जाईल. त्याच्या होणाऱ्या परिणामास संबंधित प्रशासन व ठेकेदार जबाबदार असतील, याची नोंद घ्यावी.


