बंडगार्डन पोलिसांची दमदार कामगिरी, चोरी गहाळ झालेले 51 मोबाईल नागरिकांना केले परत, नागरिकांनी मानले पोलिसांचे आभार,
संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा ) बंडगार्डन पोलीस ठाणेच्या हद्दीमध्ये नागरिकांचे हरवलेले तसेच गाळ झालेले मोबाईल परत मिळवण्याची शाश्वती खूपच कमी असताना बंडगार्डन पोलिसांनी तब्बल 51 मोबाईल परत मिळवण्यात यश मिळवले आहे. संबंधित नागरिकांना हे मोबाईल पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याहस्ते परत करण्यात आले आहेत. बंदगार्डन पोलिसांच्या या कामगिरीबद्दल नागरिकांकडून अभिनंदनचा वर्षाव होत आहे. पुणे स्टेशन ते पीएमपील बस स्टँड ससून रुग्णालय परिसर आणि गर्दींच्या ठिकाणाहून नागरिकांकडून घाण झालेले तसेच चोरी गेलेल्या हे मोबाईल आहेत. सदरची कामगिरी बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र गायकवाड गुन्हे पोलीस निरीक्षक संपतराव राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली पथकांने केली आहे,*

