भेलके महाविद्यालयाची कास पठार येथे पर्यावरण जनजागृती क्षेत्र भेट.


 

मुख्य संपादक:मंगेश पवार

कार्यकारी संपादक: सागर खुडे

ADVERTISEMENT

 

कास हा जैवविविधतेचा हॉटस्पॉट आहे. हे पठार त्यावर ऑगस्ट ते ऑक्टोबर या काळात फुलणाऱ्या विविध प्रकारच्या रानफुलांसाठी आणि फुलपाखरांसाठी प्रसिद्ध आहे. पठाराची समुद्रसपाटीपासूनची उंची १००० ते १२५० मीटर, आणि क्षेत्रफळ अंदाजे १० चौ.किमी आहे. या पठारावर २८० फुलांच्या प्रजाती व वनस्पती वेली, झुडपे आणि इतर प्रजाती मिळून ८५० प्रजाती आढळतात. येथे आययूसीएनच्या प्रदेशनिष्ठ लाल यादीतील (International Union for Conservation of Nature and Natural Resources) यांनी नष्टप्राय होण्याचा धोका असलेल्या घोषित प्रादेशिक प्रजातींची यादीतील २८० पुष्प प्रजातींपैकी ३९ प्रजाती येथे आढळतात. येथे सुमारे ५९ जातींचे सरपटणारे प्राणी आढळतात. यावेळी विद्यार्थ्यांनी सीतेची आसवे, नीळावंती, सोनकी, रान हळद , चावर, निसुर्डी , नीलीमा, कारवी, तेरडा अशी विविधरंगी फुले विद्यार्थ्यांनी पाहून त्याबद्दल माहिती घेतली. या क्षेत्रभेटीचे नियोजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर तुषार शितोळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रा. जाधवर डी. एस. यांनी प्रा. कोळपे एम डी. प्रा. कोंडे माऊली, प्रा. कोमल पोमन , प्रा. भूषण समगिर यांच्या सहकार्याने केले. या क्षेत्र भेटीसाठी महाविद्यालयातील एकूण 22 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!