ह.भ .प. चैतन्य सयाजी वाडेकर महाराजांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ठोकल्या बेड्या :- घरासमोरचा रस्ता पोकलेनने बेकायदेशीरपणे खोदणे महाराजांना भावले.
संभाजी पुरीगोसावी पुणे प्रतिनिधी.
पुण्यासह राज्यांत प्रसिद्ध असलेले कीर्तनकार आणि सोशल मीडियावर सक्रिय असलेले ह.भ.प.चैतन्य महाराजांना पिंपरी-चिंचवड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत ह.भ.प.चैतन्य महाराज यांच्यासह त्यांच्या दोन भावांनाही पोलिसांनी ताब्यांत घेतले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांच्या या कारवाईमुळे सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली आहे. सोशल मीडियाच्या माध्यमांतून उपदेशांचे डोस पाजणारे चैतन्य महाराज वाडेकर चांगलेच प्रसिद्ध आहेत. मात्र सोशल मीडियावर संत बनवून पाहणाऱ्या या चैतन्य महाराजांचा एक प्रताप समोर आला आहे. ह.भ.प. चैतन्य महाराजांनी त्यांच्या दोन भावांसह त्यांच्या घरात घरांच्याजवळ जाणारा रस्ता पोकलनने बेकायदेशीरपणे खोदल्याचे समोर आले आहे. चाकण एम.आय.डी.सी हद्दीतील चैतन्य वाडेकर आपल्या कुटुंबासमवेत वास्तव्यास आहे. चाकण एम.आय.डी.सी हद्दीतील जमिनीवरुन त्यांचा एका बिल्डरसमवेत वाद सुरू होता. सरकारी मोजणीद्वारे हा वाद सोडवला जावा, अशी वाडेकर कुटुंबीयांची भूमिका होती, पण अनेक वर्षापासून त्यांची मागणी प्रत्यक्षात येत नव्हती. आपल्याच मालकीची जागा असल्याचे म्हटले त्यावर कडी लावून त्यांनी पोकलनने लावून हा प्रताप केला. त्यामुळे त्यांच्या विरोधांत महाळुंगे पोलीस ठाण्यात प्रकरण दाखल झाली होती. घटनेची पडताळणी करण्यासाठी पिंपरी चिंचवड पोलीस पोचलेले तेव्हा महाराजांनी कथीतपणे पोलिसांनाही सुनावले त्यावर पोलिसांनी अखेर कायद्याचा हिसका महाराजांना दाखवला,*


