सातारा:समाजाच्या संरक्षणासाठी संघटन गरजेचे -डॉ सुधाकर वायदंडे यांचे प्रतिपादन
दिलीप वाघमारे
सातारा येथे दलित महासंघाची(वायदंडे गट) जिल्हास्तरीय बैठक संपन्न
समाजावरती चालत असलेल्या अन्याय अत्याचाराचा बिमोड करून समाजाचे संरक्षण करण्यासाठी संघटन गरजेचे असल्याचे प्रतिपादन दलित महासंघाचे राज्याध्यक्ष डॉ.सुधाकर वायदंडे यांनी केले.
ते सातारा जिल्हा दलित महासंघ(वायदंडे गट) व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या नविन पदाधिकारी निवडी व जिल्हास्तरीय बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
सदर बैठक सातारा येथील विश्रामगृहावर पार पडली.
दलित महासंघाचे प.महा अध्यक्ष अशोकराव गायकवाड,प. महा कार्याध्यक्ष सदाभाऊ चांदणे, युवक आघाडीचे प.महा अध्यक्ष सुनिल मोरे सर प्रमुख उपस्थित होते.
यावेळी दलित महासंघाच्या सातारा जिल्हाध्यक्षपदी कवठे ता वाई गावचे स्वातंत्र्य सैनिक कै लालासाहेब खुडे यांचे नातू तर कै नेताजी खुडे यांचे चिरंजीव निलेश नेताजी खुडे यांची निवड करण्यात आली, आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या जिल्हाध्यक्षपदी नम्या यंत्र्या भोसले,महिला आघाडी जिल्हा सचिवपदी पूजा अविनाश भोसले, जिल्हा उपाध्यक्षपदी रागिणी विनोद भोसले, सातारा ता. अध्यक्षपदी मुरलीधर नम्या भोसले,फलटण ता. उपाध्यक्षपदी विकी भैरू पवार यांच्या डॉ.सुधाकर वायदंडे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवडी करण्यात आल्या.
यावेळी बोलताना डॉ.सुधाकर वायदंडे म्हणाले,दलित महासंघ ही छ.शिवाजी महाराज,म.ज्योतीबा फुले,छ.शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर,लो.अण्णाभाऊ साठे यांच्या विचारावर चालणारी संघटना आहे.
बहुजन, दलित आदिवासी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी दिवंगत प्रा.मधुकर वायदंडे यांनी आक्रमक लढा उभा केला आहे.
युवकांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे,अन्याय अत्याचाराला वाचा फोडणे,शासकीय योजनांच्या फक्त घोषणा केल्या जातात परंतु या योजनांची अंमलबजावणी होते का हा प्रश्नच आहे.
शोषित,पीडित,वंचित तसेच समाजातील शेवटच्या घटकाला त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी दलित महासंघ प्रयत्नशील आहे असे सुधाकर वायदंडे यांनी शेवटी सांगितले. यावेळी नितीन मोरे,रमेश सोनावने,अजित मेंढेकर,दिलीप बागल,धनाजी मोहिते,सल्लाउद्दीन पठाण,अंकुश चव्हाण,काशिनाथ ससाने,तेजस भोसले,राकेश भोसले, अंबरशेख भोसले यांच्यासह मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते.