भोर तालुक्यातील मसवली येथील वेळवंडी नदीत बुडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.
भोर :- भोर तालुक्यातील गणेश नगर तळेमसवली येथील शंकर मारुती लांडे वय 60 वर्ष या जेष्ठ नागरिकाचा पोहताना पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 9/3/25 रोजी सकाळी 10:30 वाजता च्या सुमारास शंकर मारुती लांडे हे जनावरांना पाणी पाजण्यासाठी गाव पाणवठा या ठिकाणी गेले होते. जनावरांना पाणी पाजले परंतु लांडे हे वेळवंडी नदीच्या पात्रात पोहण्यासाठी गेले असता पाण्यातून बाहेर आलेच नाही त्यामुळे गावकऱ्यांच्या मदतीने त्या ठिकाणी शोध घेतला तसेच भोईराज जल आपत्ती मंडळ भोर यांच्या कार्यकर्त्यांनी दोन तास शोध घेऊन शंकर लांडे यांना पाण्यातून बाहेर काढले असता त्यांची काही हालचाल होत नव्हती.
याबाबत रवींद्र आनंदा गायकवाड वय 33 वर्ष गणेश नगर तळेमसवली यांनी याबाबत राजगड पोलीस स्टेशन येथे खबर दिली आहे.
याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस फौजदार शिरसाठ करीत आहेत.