लोणंद शहरामध्ये गुणवंत विद्यार्थी विद्यार्थिनींचा सत्कार समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न.
संपादक: दिलीप वाघमारे
दिनांक २२ मार्च २०२५ रोजी लोणंद येथील प्रभाग क्रमांक ३ मधील बिरोबा मंदिरा मध्ये सौ दिपाली निलेश शेळके पाटील नगरसेवक लोणंद नगरपंचायत यांच्यातर्फे गुणवंत विद्यार्थी यांचा सत्कार घेण्यात आला. यासाठी इंडियन पोस्ट पेमेंट बँक सोलापूर डिव्हिजन चे सीनियर मॅनेजर श्री. विनायक जी पासंगराव आणि सहाय्यक वनसंरक्षक(वर्ग एक) श्री. किशोरजी येळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये श्रीनाथ रणवरे, श्रद्धा रणवरे, किशोर शिंगाडे, हर्षद पवार, योगेश क्षीरसागर, प्रतीक जाधव, सुमित राऊत, मयूर चोरमले, गणेश जगताप, आदित्य शशिकांत खताळ, कुमारी ज्ञानेश्वरी नवनाथ महानवर यांनी स्पर्धा परीक्षांमध्ये विशेष यश आणि डॉ. अक्षय दत्तात्रय शेळके, गणेश धायगुडे, मंगेश माने, प्रणव संकपाळ, मनीष संकपाळ, रुपेश संकपाळ, संदीप दादासो शेळके, जुनेद इनामदार, आणि डॉ स्नेहल खंकाळ-गायकवाड यांना विविध क्षेत्रांमध्ये विशेष प्राविण्य मिळवल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सौ प्रीती घाडगे नगरसेविका लोणंद नगरपंचायत यांच्यासह लोणंद शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामध्ये बोलताना प्रमुख पाहुणे श्री विनायकरावजी पासंगराव म्हणाले, जीवनामध्ये आपल्या अवतीभवती आदर्श शोधणं ही निरंतर प्रक्रिया आहे आणि ती आपल्या प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरते. याशिवाय गौतम बुद्ध यांनी सांगितल्याप्रमाणे “अत्त दीप भव” म्हणजे स्वतःचा प्रकाश स्वतः व्हा, तुमच्या मध्येच तुमचा आदर्श तुम्हाला सापडेल. या प्रसंगी श्री म्हस्कुआण्णा शेळके-पाटील, श्री लक्ष्मण तात्या शेळके-पाटील, श्री सुनील सर शेळके-पाटील, सागर मामा शेळके-पाटील यांनी आपली मनोगते व्यक्त केली. याशिवाय पुरस्कारार्थींमधून डॉ स्नेहल खंकाळ-गायकवाड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले. निवेदन आणि सूत्रसंचालन श्री निलेश शेळके पाटील यांनी केले.


