शंकरराव लोकरे यांचे निधनामुळे सामाजिक नेतृत्व हरपले आयु.साहेबराव आनंदा लोखंडे साहेब येवती ता.कराड माजी अध्यक्ष,भारतीय बौद्ध महासभा जि.सांगली
उपसंपादक : दिलीप वाघमारे
मसूर गावचे प्रतिष्ठीत तसेच बँक आँफ महाराष्ट्र चे निवृत अधिकारी व आरपीआयचे जिल्हा महासचिव कालकथीत शंकर मारुती लोकरे यांचा जलदान विधी व शोकसभा कार्यक्रम आज सकाळी रमाबाई निवास मसूर या त्यांचे घरी संपन्न झाला,
त्यावेळी सहकार सामाजिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर तसेच आप्तेष्ट मित्रपरिवार मंडळी तसेच मसूर येथील लोकरे,कारणे,भंडारे,कांबळे व वाघमारे परिवाराचे उपस्थितीत कालकथीत शंकर लोकरे यांचे स्मृतीला उजाळा देवून बौद्धाचार्य आयु.दादासो रामचंद्र कांबळे यांचेकडून विधीकार्य संपन्न झाले व मान्यवरांकडून
अभिवादन करण्यात आले,
त्याप्रसंगी आप्पासाहेब बनसोडे,भारतीय बौद्ध महासभाचे तानाजी बनसोडे,जगन्नाथ अडसुळै,रामचंद्र गायकवाड,आर.व्ही.पाटणकर साहेब,
आर.के.कांबळे,
बाजीराव गोखले
लोकरे यांचे बंधू उमेश लोकरे तसेच सातारा जिल्हा आरपीआय व भारतीय बौद्धमहासभा मान्यवर पदाधिकारी विविध मान्यवर उपासक महिला उपासिका तसेच आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते,
त्यावेळी पंचशील युवक मंडळ व स्वागत युवा मंडळ आणि संत रोहिदास सामाजिक मंडळाने व्यवस्थापन केले,


