ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी येथे शिक्षक दिन रक्तदान करून साजरा; डॉ. मंदार माळी, डॉ. ज्ञानेश्वर महाडिक यांच्या हस्ते.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
दि. ६ सारोळे : कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण संस्था ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी येथे शिक्षकदिन याचे औचित्य साधून पुरंदर ब्लड सेंटर ,आय व्हिजन नसरापूर आणि यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार दि. ५ रोजी भव्य रक्तदान शिबीर, नेत्र चिकित्सा शिबिर मोफत व मोफत शरीर चिकित्सा यांचे आयोजन करण्यात आले.
यावेळेस शाळेमध्ये सर्व पालक त्याच पद्धतीने आजूबाजूच्या गावातील लोकांचा उत्स्फूर्तपणे प्रतिसाद पाहण्यास मिळाला.
शाळेचे मुख्याध्यापक उमेश बन्सीलाल सोनावले तसेच कॉर्डिनेटर सौ.जानवी उमेश सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम पार पडले. यावेळेस १०४ लोकांनी रक्तदान , १२६ लोकांनी डोळ्यांची तपासणी आणि २६० लोकांनी शरीर तपासणी केली.
या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून डॉक्टर मंदार माळी आणि सारोळे गावातील डॉक्टर ज्ञानेश्वर महाडिक यांना बोलवण्यात आले होते.
डॉ. महाडिक डॉ.माळी यांच्या हस्ते कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली.

रक्तदान हेच जीवनदान, रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असे समजले जाते. विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील साठा कमी पडू लागला आहे. याच अनुषंगाने तरुणाईमध्ये रक्तदानाचे महत्त्व दूर जाऊ नये आणि त्यांना साठी प्रेरित करण्याचे हेतूने ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.
डॉ. मंदार माळी इमरजेंसी मेडिकल ऑफिसर बीव्हीजी १०८ अत्यावश्यक सेवा किकवी
अभ्यासानुसार महाराष्ट्रात दररोज सर्व प्रकारच्या ४५०० ते ५००० रुग्णांना रक्ताची गरज लागते. पण त्या प्रमाणात रक्तपुरवठा फार कमी होतो असे दिसून आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त रक्त संकलन करण्याची गरज निर्माण झाली आहे. यामुळेच रक्तदानाच्या या चळवळीमध्ये ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी यांनी रक्त संचलन करून मोलाचे काम केले. रक्तदाब मधुमेह असलेल्या 55 पेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींनी रक्तदान करू नये तसेच रक्तदाब व मधुमेह असलेल्या 55 पेक्षा कमी वयाच्या व्यक्तींनी HBA1C ही चाचणी करून मगच रक्तदान करावे.
डॉ.ज्ञानेश्वर महाडिक, श्रद्धा क्लिनिक सारोळे

भैरवाडी येथील महादेव जानकर यांना ३० वर्ष डॉ.ज्ञानेश्वर महाडिक यांनी रुग्णसेवा दिली. त्यांच्या चिरंजीवीला आज रक्तदान शिबिरामध्ये रक्तदान करण्याचा पहिला मान मिळाला.रक्तदान शिबीर मध्ये १०४ लोकांनी रक्तदान केले.


