हिर्डोशी शाळेतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तत्काळ निकाली; प्रशासनाची तातडीची दखल


मंगेश पवार

भोर : हिर्डोशी येथील जिल्हा परिषद शाळेत पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नसल्याची बातमी प्रसिद्ध होताच प्रशासनाने तत्काळ दखल घेत कारवाई केली. विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यासाठी होत असलेल्या गैरसोयीबाबत स्थानिक पातळीवरून आवाज उठविण्यात आला होता.

या संदर्भात पंचायत समिती भोर येथील मा. गटविकास अधिकारी यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा करण्यात आली. त्यांच्या सूचनेनुसार संबंधित ग्रामसेवकांना तातडीने शाळेस भेट देऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश देण्यात आले.

ADVERTISEMENT

ग्रामसेवक श्री. अनिल अभंग यांनी सरपंच यांच्या उपस्थितीत शाळेस भेट देत पाणीपुरवठा यंत्रणा तपासली व आवश्यक ती कार्यवाही करून पाणीपुरवठा पूर्ववत सुरू केला. त्यामुळे विद्यार्थ्यांना तात्काळ पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले असून शिक्षक व पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान, या प्रश्नावर पाठपुरावा करण्याचे काम प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका अध्यक्ष अजय कांबळे यांच्या वतीने करण्यात आले. संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवून त्यांनी प्रश्न निकाली काढण्यासाठी पुढाकार घेतला.

शाळेसारख्या संवेदनशील ठिकाणी मूलभूत सुविधांचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने नियमित पाहणी करावी, अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!