कर्तव्यदक्ष सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी पुसेगांव पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार ..
संपादक : संभाजी पुरीगोसावी
तीर्थक्षेत्र सेवागिरी देवस्थानच्या नगरीतील पुसेगांव पोलीस ठाण्याला आजपर्यंतच्या इतिहासात कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांची या पोलीस ठाण्यात चांगलीच वर्णी दिसून आली आहे, सातारा जिल्हा पोलिस दलात नव्याने दाखल झालेले आणि सातारा तालुका पोलीस ठाण्यात काम पाहत असणारे तसेच रायगड जिल्हा पोलीस दलात विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा देणारे मूळचे पुणे जिल्ह्यातील कर्तव्यदक्ष सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांनी नुकताच जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्या आदेशावरुन पुसेगांव पोलीस ठाण्याचा पदभार स्वीकारला आहे, तर मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे यांची जिल्ह्यातील कार्यकाळ पूर्णता: झाल्यामुळे सोलापूर ग्रामीणला नुकतीच बदली झाली आहे, त्यांनीही सातारा जिल्हा पोलीस दलात दाखल झाल्यापासून आपल्या कार्यकाळामध्ये वाई भुईंज पुसेगांव अशा विविध पोलीस ठाण्यात उत्कृंष्ट सेवा दिली आहे, जिल्ह्यांतील पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेहमीच जनतेशी जनसंपर्क वाढवून त्यांनी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील, राहिले आहेत, तसेच नव्याने दाखल झालेले पुसेगांव पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप पोमण यांची देखील पोलीस प्रशासनात कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळख आहे.


